Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»थेरगावमधील केजुदेवी उद्यान आणि केजुबाई बंधारा विकासाला मंजुरी; ‘वनगंध’ प्रकल्पांतर्गत साकारणार जलक्रीडा पर्यटन केंद्र…अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

थेरगावमधील केजुदेवी उद्यान आणि केजुबाई बंधारा विकासाला मंजुरी; ‘वनगंध’ प्रकल्पांतर्गत साकारणार जलक्रीडा पर्यटन केंद्र…अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नदीचे सौंदर्य वाढणार, नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारा आणि सौंदर्यात भर घालणारा ‘वनगंध’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांच्या भेटीला येत आहे. या प्रकल्पांतर्गत थेरगाव येथील बोट क्लब व केजुदेवी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या नावामध्ये सुधारणा करून तिथे जलक्रीडा पर्यटन विकसित करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच अभिषेक बारणे यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प विकासाची सविस्तर माहिती घेतली. तसेच, संबंधित विभागाला आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना केल्या. या प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सिद्धेश्वर बारणे, ‘मे. शिल्पी आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्स’चे वास्तुविशारद पारस एस. नेत्रगावकर हे देखील उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना निसर्ग, पाणी आणि सार्वजनिक जीवनाशी जोडणारा सर्वसमावेशक परिसर या प्रकल्पातून निर्माण केला जात आहे. नदी नागरिकांसाठी खुली करणे आणि वनातून फेरफटका मारण्याचा अनुभव देणारे सार्वजनिक केंद्र निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची रचना मनोरंजन, पर्यावरण आणि संस्कृती यांच्या मिलाफातून करण्यात आली असून, येथे येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य प्रवेशद्वार, आगमन क्षेत्र आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

या प्रकल्पाच्या मुख्य आकर्षणांमध्ये अॅम्फीथिएटर, समुदाय बैठक व्यवस्था, फोटो बूथ, मचान, तसेच बोटिंग जेट्टी, फेरी बोट आणि विविध जलक्रीडांचा (वॉटर स्पोर्ट्स) समावेश आहे. याशिवाय आरोग्य आणि विहारासाठी जॉगिंग ट्रॅक, मुलांचे खेळण्याचे क्षेत्र, निसर्गवाटा (नेचर ट्रेल्स), पुष्पोद्यान, इको पार्क, वॉच टॉवर, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष जागा, विलोभनीय घाट आणि एक मंदिर परिसर उभारला जाणार आहे.

निसर्ग सफर, विपुल हिरवाई आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचा सुंदर मेळ या प्रकल्पात पाहायला मिळणार आहे. हा परिसर केवळ एक पारंपारिक उद्यान न राहता, नदी, निसर्ग आणि समाज यांच्यात निरंतर संवाद साधणारे एक चैतन्यपूर्ण शहरी केंद्र म्हणून आकार घेणार असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि उत्तम विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. थेरगाव येथील ‘वनगंध’ प्रकल्पामुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढणार नाही, तर याठिकाणी नागरिकांसाठी जलक्रीडा पर्यटनाचा एक नवीन आणि उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होईल. हा प्रकल्प नदी, निसर्ग आणि समाज यांना जोडणारा एक आदर्श ठेवा ठरेल”. 

– अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
Next Article विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?