Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज
पिंपरी चिंचवड

गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन

पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. गणेशोत्सव काळात नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी घेतला.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ही बैठक झाली. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, महेश आढाव, अंकुश झिटे, राजेश भाट, अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, गणेश मंडळांचे परिसर तसेच विसर्जन मार्गांची नियमित स्वच्छता राखावी. विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि स्वच्छता सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत गणेशोत्सवासाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी.

निर्माल्य कुंड, कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, गणेश मंडळांचे परिसर तसेच विसर्जन मार्गांवरील स्वच्छता सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंड तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंडांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश डॉ. ठेंगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था प्रभावीपणे राबवावी. विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य नियमितपणे उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. गणेशोत्सव काळात नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची आवश्यक तैनाती करावी, असेही निर्देश देण्यात आले.

विसर्जन मार्गांवरील स्वच्छतेवर विशेष भर

गणेशोत्सव काळात गणेश मंडळांचे परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि विसर्जन मार्गांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कचरा साचणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करावे. विसर्जनानंतर संबंधित ठिकाणांची तातडीने स्वच्छता करून परिसर पूर्ववत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

गणेशोत्सव काळात स्वच्छता व्यवस्था, निर्माल्य संकलन, कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था आणि विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा याबाबत सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्यवाही करावी. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित गणेशोत्सवाचा अनुभव मिळण्यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, असे डॉ. ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून १.१९ लाख विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे
Next Article पिंपरीगावात संदीप वाघेरे युवा मंचाची दहीहंडी जल्लोषात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?