Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शहराच्या पायाभूत सुविधा व नागरिक सेवांना बळकटी; स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी चिंचवड

शहराच्या पायाभूत सुविधा व नागरिक सेवांना बळकटी; स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, बीआरटीएस, डिजिटल सुरक्षा आणि प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

महापालिकेच्या संगणक यंत्रणेची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी ३ हजार अँटी-व्हायरस प्रणाली खरेदी करण्यास तसेच तीन वर्षांसाठी सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे महापालिकेच्या विविध विभागांतील संगणकीय प्रणालींची सुरक्षा व तांत्रिक देखभाल अधिक प्रभावी होणार आहे.

शहरातील महत्त्वाच्या रस्ते व बीआरटीएस मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्यविषयक दुरुस्ती, नाशिक फाटा ते वाकड कॉरिडॉर क्रमांक ३ रस्त्याची देखभाल-दुरुस्ती तसेच औंध-रावेत बीआरटीएस मार्गावरील बसथांबे व स्थापत्य सुविधांचे मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.

नव्याने स्थापन झालेल्या ‘लोहगड’ क्षेत्रीय कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व स्थापत्य कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग समिती सभागृह, अध्यक्ष कक्ष, क्षेत्रीय अधिकारी, लेखा विभाग, कॅश काउंटर तसेच स्थापत्य व विद्युत विभागासाठी आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच कान, नाक व घसा विभागातील Debrider Otology Microdrill and Steps Drill System या उपकरणाच्या पुढील एक वर्षाच्या सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्तीला मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देत शहरातील विविध पाण्याच्या टाक्या, जलक्षेत्र, जलवाहिन्या व वितरण व्यवस्थांच्या परिचालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. बोपखेल, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड-भगवाननगर-काळाखडक, श्रीनगर, पिंपरीनगर, पिंपरी गाव, पाटीलनगर-चिखली, जाधववाडी-कुदळवाडी आदी भागांचा यात समावेश आहे. आवश्यक मजूर, वाहनचालक व टँकर व्यवस्था उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.

पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याच्या विकासासोबतच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अधिक क्षमतेच्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्याच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली. परिसरात फसाड लाइटिंग, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा आणि आकर्षक एलईडी प्रकाश व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १० मधील एमआयडीसी परिसरातील रस्ते आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी QCBS पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच उद्यान विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन पाच उद्यान अधिकारी व तीन सहाय्यक उद्यान अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर पुनर्नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्रमांक १२ मधील गणेशोत्सव विसर्जन-संकलन व्यवस्था, विविध महापालिका कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ सात दिवस आयोजित करण्यास मंजुरी देण्यात आली.

 “नियमित पाणीपुरवठा, सक्षम रस्ते व बीआरटीएस सुविधा, दर्जेदार आरोग्य सेवा आणि डिजिटल सुरक्षा यांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासकीय कार्यक्षमता, सेवांची गुणवत्ता आणि नागरिकहित या बाबींना केंद्रस्थानी ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती सातत्याने कार्यरत राहील.”

…… अभिषेक बारणे. स्थायी समिती अध्यक्ष.पिं.चिं.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वाय. ई. एस. इंग्लिश स्कूलची बाजी
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय उत्सवांसाठी सर्वसमावेशक धोरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?