Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय उत्सवांसाठी सर्वसमावेशक धोरण
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय उत्सवांसाठी सर्वसमावेशक धोरण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची घोषणा; आयोजनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यावर भर

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत साजऱ्या होणाऱ्या विविध महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी आणि राष्ट्रीय उत्सवांच्या आयोजनात सुसूत्रता आणण्यासाठी आणि खर्चात पूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी लवकरच एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन आणि राष्ट्रीय उत्सवांच्या खर्चाचा व आयोजनाचा हिशोब पारदर्शक राहावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी दरवर्षी एक निश्चित बजेट आणि वार्षिक निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत हे सोहळे आयोजित केले जातात. परंतु, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती असताना समितीला याबाबत कल्पना नसते. तसेच, कार्यक्रम आयोजनाबाबत स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे पदाधिकारी यांना पूर्वकल्पना नसल्याची तक्रार होते. त्यामुळे, हे सर्व प्रकार थांबण्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा आदर करून सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी. पुढील आठ दिवसांत याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करावा, अशा सूचना यावेळी अभिषेक बारणे यांनी दिल्या.

फेरनिविदा, उशिराने प्रस्ताव आणण्याच्या पद्धतीला बसणार आळा

प्रत्येक जयंतीच्या वेळी स्वतंत्रपणे कागदपत्रे तयार करणे, ऐनवेळी निविदा काढणे किंवा उशिराने प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणण्याची पद्धत या नव्या धोरणामुळे पूर्णपणे बंद होणार आहे. वार्षिक स्तरावर सर्व कार्यक्रमांचे नियोजन आधीच झाल्यास कार्यक्रमांच्या दर्जात वाढ होईल आणि प्रशासकीय वेळेचीही बचत होईल, असा विश्वास यादरम्यान व्यक्त करण्यात आला.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांतील नियोजनावर भर

नव्या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यासाठी आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत येणाऱ्या महामानवांच्या जयंत्या व स्मृती दिनांचे नियोजन आत्तापासूनच करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी एक सोपी आणि कार्यक्षम कार्यपद्धती तयार केली जाणार असून, त्यानुसारच सर्व आयोजन पार पाडले जातील. जयंत्या व राष्ट्रीय उत्सवांच्या आयोजनात एकरुपता आणून महापालिकेच्या माध्यमातून हे सोहळे अधिक भव्य आणि सुसंस्कृत पद्धतीने पार पाडण्यासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“महापुरुषांचे विचार आणि कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, महापालिकेतर्फे साजऱ्या होणाऱ्या या महापुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय उत्सव आणि विविध महोत्सवांच्या आयोजनामध्ये कोणतीही अनियमितता किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कार्यक्रमाचा हिशोब पारदर्शक असावा आणि वेळेवर निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आपण हे सर्वसमावेशक धोरण आणत आहोत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील आगामी उत्सवांपासूनच या मानक कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, जेणेकरून हे सर्व सोहळे अधिक शिस्तबद्ध, देखणे आणि दर्जेदार पार पडतील.”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या पायाभूत सुविधा व नागरिक सेवांना बळकटी; स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी
Next Article बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव; कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?