Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 

पिंपरी, प्रतिनिधी : स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने आयोजित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव व प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

म्हातोबा मंदिर सभागृह वाकड येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका श्रुतीताई वाकडकर, रेश्माताई भुजबळ, ख्यातनाम पखवाज वादक ह.भ.प. तुकाराम भुमकर, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. लहू महाराज जमदाडे, शास्त्रीय गायक नामदेव शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या सत्रामध्ये स्वरश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रागातील बंदिशी आणि छोटेख्याल सादर केले. त्यांना हार्मोनियमवर हरिभाऊ असतकर, गंगाधर शिंदे, तबल्यावर विक्रम शिंदे, यश त्रिशरण, पखवाजवर ओम विनोदे आणि टाळ मकरंद बादरायणी यांनी साथसंगत केली.

पहिल्या सत्राचा समारोप शास्त्रीय गायक नामदेव शिंदे यांच्या गायनाने झाला. त्यांनी विलंबित एकतालातील शुद्ध सारंग हा राग गायला आणि त्यानंतर ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे’, या भजनाने पहिल्या सत्राची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर हरिभाऊ असतकर, तबल्यावर संतोष साळवे, पखवाजवर गंभीर महाराज अवचार, टाळ साथ मकरंद बादरायणी, तानपुरा साथसंगत लक्ष्मण कोळी आणि विवेक गवळी यांनी केली. हेमंत पुणेकर यांनी पहिल्या सत्राचे निवेदन केले.

दुसऱ्या सत्रामध्ये स्वरश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन, तसेच विक्रम शिंदे यांच्या शिश्यांचे तबलावादन झाले. या तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करीत टाळ्या मिळविल्या. दुसऱ्या सत्राचा समारोप अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या प्रगल्भ आणि दमदार गायनाने झाला. रसिकांना एक स्वरस्मरणीय अनुभव घेता आला. पंडित सुधाकर चव्हाण यांनी विलंबित एकताल आणि यमन रागातील ‘काहे सखी…’ या रचनेतून आणि ‘श्याम बजाये आज मुरलिया’ या बंदिशी सादर केली. त्यानंतर शास्त्रीय गायक आणि पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य शिवानंद स्वामी यांनी रचलेली मधुकंस रागातील ‘बनरा रे संग आजा…’ ही बंदिश सादर केली. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पंडित दत्तात्रय भावे, पखवाजवर गंभीर महाराज अवचार, टाळ साथसंगत मकरंद बादरायणी आणि गायन साथसंगत शिवानंद स्वामी यांनी केली. अभयसिंह वाघचौरे आणि विवेक गवळी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. या सत्राचे निवेदन आकाश थिटे यांनी केले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशीतील १५ हेक्टर जागा पुनरुत्थान समरसता गुरुकुलमसाठी; सामाजिक समरसतेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
Next Article अंमली पदार्थमुक्त समाजासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?