सेवानिवृत्ती समारंभात अधिकारी-अंमलदारांचा कुटुंबीयांसह सन्मान; पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
पिंपरी-चिंचवड, दि. ३१ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार ऑगस्ट २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या चार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ सोमवारी (दि. ३१) पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे आयोजित करण्यात आला.
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस सहआयुक्त श्री. शशिकांत महावरकर तसेच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरेश भागुजी उगले (पोलीस मुख्यालय), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल बाबुराव देशमुख (पिंपरी पोलीस ठाणे), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक घनशाम परदेशी (पिंपरी पोलीस ठाणे) आणि पोलीस शिपाई क्र. २८७३ श्री. शशिकांत बापुसाहेब कांबळे (हिंजवडी पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांनी पोलीस दलात बजावलेल्या प्रदीर्घ सेवेसाठी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय नरावाड (कल्याण शाखा), सहायक पोलीस निरीक्षक श्री. राकेश भामरे (कल्याण शाखा) यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-अंमलदार, सेवानिवृत्त होणारे अधिकारी-अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
