Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चिंचवडची ९ वर्षीय अन्वी हिंगे बुद्धिबळाच्या जागतिक पटावर; १३ आंतरराष्ट्रीय पदकांसह भारताचा गौरव!
पिंपरी चिंचवड

चिंचवडची ९ वर्षीय अन्वी हिंगे बुद्धिबळाच्या जागतिक पटावर; १३ आंतरराष्ट्रीय पदकांसह भारताचा गौरव!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अल्पवयात WCM किताब, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाचा बहुमान; विश्वविजेतेपदाचे ध्येय घेऊन अन्वीची दमदार वाटचाल

पिंपरी-चिंचवड, दि. ०१ सप्टेंबर २०२६ : वय अवघे नऊ वर्षे… हातात बुद्धिबळाचे मोहरे आणि डोळ्यांसमोर भारतासाठी जागतिक स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवण्याचे स्वप्न! चिंचवड येथील युवा बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने अत्यंत कमी वयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

अन्वीने Woman Candidate Master (WCM) हा प्रतिष्ठेचा किताब प्राप्त केला असून FIDE Girls Under-9 रेटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवण्याचाही बहुमान तिने संपादन केला आहे. World Cadet & Youth Rapid Chess Championship (Girls U8) स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत तिने जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. अवघ्या नऊ वर्षांच्या वयात भारतासाठी तिने आतापर्यंत तब्बल १३ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

ग्रीस, ताजिकिस्तान, मलेशिया आणि थायलंडसह विविध देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये अन्वीने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य U-9 मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्येही तिने विजेतेपद पटकावले. यापूर्वी महाराष्ट्र राज्य U-7 मुलींच्या गटातही ती विजेती ठरली असून राष्ट्रीय स्तरावरदेखील तिने पदके मिळवली आहेत.

अन्वीच्या या असामान्य कामगिरीची दखल राज्यस्तरावरही घेण्यात आली असून मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक माध्यमांनीही तिच्या यशस्वी वाटचालीची दखल घेतली आहे.

अन्वी सध्या Elpro International School, Chinchwad येथे शिक्षण घेत आहे. अभ्यास आणि बुद्धिबळाचा उत्तम समतोल साधत ती ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि फिडे मास्टर सिद्धांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण घेत आहे. भारताचे प्रतिनिधित्व करून जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करण्याचे तिचे ध्येय असून त्यासाठी ती सातत्याने मेहनत घेत आहे.यावेळी अन्वीचे आई वडील आरती दिपक हिंगे, दिपक जगन्नाथ हिंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या शलाका कोंडावार उपस्थित होते.

आज महापौर कार्यालयात अन्वीच्या आजवरच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

“अवघ्या नऊ वर्षांच्या वयात अन्वीने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक स्तरावर पिंपरी-चिंचवडचे नाव पोहोचवले आहे. आपल्या शहरातील अशा गुणवंत खेळाडूंचे यश हे संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आज अन्वीच्या हातात बुद्धिबळाचे मोहरे असले, तरी तिच्या डोळ्यांत भारतासाठी विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न आहे. तिची ही जिद्द शहरातील हजारो मुला-मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देईल. अन्वीने भविष्यात जागतिक बुद्धिबळाच्या पटावर विक्रम नोंदवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवावा,” 

– रवि लांडगे, महापौर

Post Views: 18
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त
Next Article भटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?