Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»प्रदीर्घ सेवेनंतर सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव सेवानिवृत्त
पिंपरी चिंचवड

प्रदीर्घ सेवेनंतर सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव सेवानिवृत्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आला सन्मान

पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावणारे सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि सुभाष जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुभाष जाधव यांनी महापालिकेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. देशसेवेनंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रवेश केला. महापालिका सेवेतही त्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडली.

हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे जाधव यांनी सहकाऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भावना व्यक्त करताना सुभाष जाधव म्हणाले, “आपले काम प्रामाणिकपणे करणे आवश्यक असते. माझ्या सेवाकाळात हे तत्त्व पाळण्याचा मी प्रयत्न केला. महापालिकेत काम करत असताना सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य नेहमी मिळाले. यामध्ये कुटुंबीयांची साथ देखील मिळाली. यापुढील काळात कुटुंबासोबत वेळ घालवण्याबरोबरच नाविन्यपूर्ण छंद जोपासण्याचा तसेच पर्यटन करण्याचा माझा मानस आहे.”

वयाच्या अवघ्या साडेसतरा वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर २० वर्षे सैन्यदलात देशाची सेवा बजावली. त्यानंतर महापालिकेत त्यांनी सुरक्षा विभागामध्ये २२ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली. त्यांच्या या कार्याचा गौरव करून यावेळी त्यांना उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Next Article पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?