Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 31, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते,पदपथ,स्वच्छता,विद्युत सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे दिले निर्देश

पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ :- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी. बीट निरीक्षकांमार्फत अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने निष्कासनाची कार्यवाही करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षाव्यवस्था, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देताना आयुक्त बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आदी विभागांचे कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी वेळेत पूर्ण करा

गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन हौदांची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. विसर्जनस्थळी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

याशिवाय, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासावी. धोकादायक किंवा अनधिकृत विद्युत जोडण्यांबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी. तसेच उत्सवाच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी ठेवावी आणि रस्ते खड्डेमुक्त करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी.

प्रभाग स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्याची क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी

आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावेत. प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवावीत, वेळोवेळी झाडांची छाटणी करावी तसेच रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवा

प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवावे. नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची माहिती तातडीने संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर निष्कासनाची कार्यवाही करावी. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळणार नाही, याची दक्षता घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.

अनधिकृत बांधकामांच्या नळ, वीज जोडणी खंडित करण्याबाबत कार्यवाही करा

शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात प्रभावी कारवाई करण्याबरोबरच अशा बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्या तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी.अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यासोबतच संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करावी.

सदनिका खरेदीपूर्वी बांधकामाची पडताळणी करण्याबाबत नागरिकांना जागृत करा

नागरिकांनी सदनिका किंवा इमारतीमधील मालमत्ता खरेदी करताना संबंधित बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याबाबत नागरिकांना अवगत करा. मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक परवानग्या आणि महापालिकेच्या संबंधित नोंदी तपासूनच सदनिका खरेदी करावी याबाबत नागरिकांना जागृत करा, अशा.

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा

महापालिकेच्या सारथी प्रणालीवर तसेच शासनाच्या संकेतस्थळांवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने दखल घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे तक्रारींचा आढावा घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद ठेवावी.

लोकप्रतिनिधींच्या पत्रांना, तक्रारींना वेळेत प्रतिसाद द्या

लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे प्राप्त होणारी पत्रे, निवेदने आणि तक्रारी यांची संबंधित विभागांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी. प्राप्त पत्रांना व तक्रारींना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेत संबंधित लोकप्रतिनिधींना करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत वेळेत कळवावे.

वाचनालये, ग्रंथालये व व्यायामशाळांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा

शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार जागा निश्चित कराव्यात. नागरिकांच्या गरजा आणि स्थानिक मागणीचा विचार करून या सुविधा विकसित करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या विशेष सभेच्या वैधतेवर योगेश बहल यांचा आक्षेप
Next Article राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘एक घंटा मैदान में’ आणि ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?