Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भूमिगत डक्टमध्ये श्वास गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू; वर्षभरात पाच बळी
पिंपरी चिंचवड

भूमिगत डक्टमध्ये श्वास गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू; वर्षभरात पाच बळी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,निगडी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात भूमिगत डक्टमध्ये काम करत असताना श्वास गुदमरून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २६) रात्री उघडकीस आली. रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. लोकमान्य रुग्णालयाजवळ, निर्मल व्हिला बंगल्यासमोर असलेल्या भूमिगत डक्टमध्ये ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत मनोज बाबुराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय १९) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता किंवा विषारी वायू निर्माण झाल्यामुळे दोन्ही मजुरांचा श्वास गुदमरला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

वर्षभरात एकाच डक्टमध्ये पाच बळी

दरम्यान, या घटनेमुळे भूमिगत डक्टमधील मजुरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, साधारण वर्षभरापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच डक्टमध्ये केबलचे काम करताना विषारी वायूमुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा दोन मजुरांचा बळी गेल्याने एकाच भूमिगत डक्टमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

वारंवार जीवघेण्या दुर्घटना घडूनही सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. डक्टमध्ये काम करणाऱ्या मजुरांना ऑक्सिजनची उपलब्धता, विषारी वायूची तपासणी, आवश्यक सुरक्षा साधने तसेच आपत्कालीन बचाव यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एकाच ठिकाणी वर्षभराच्या कालावधीत पाच जणांचा जीव गेल्याने संबंधित प्रशासन आणि ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करून कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशनिवारी चिंचवडमध्ये श्रेया घोषाल यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रदान
Next Article संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?