Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»प्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
पिंपरी चिंचवड

प्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना

पिंपरी दि. २६ ऑगस्ट २०२६: पिंपरी चिंचवडमधील निगडी प्राधिकरण परिसरात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण तसेच विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या केवळ कागदोपत्री न पाहता त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी परिसरातील स्थानिक व्यापारी, रहिवासी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, दैनंदिन नागरी सुविधा तसेच इतर विविध समस्यांकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची माहिती घेत संबंधित बाबींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला.

नागरिकांच्या तक्रारी व अडचणींची दखल घेत उपमहापौर बाबर यांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. परिसरातील स्वच्छतेशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, नियमित स्वच्छता राखावी आणि नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

तसेच परिसरातील अतिक्रमणाच्या बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. रस्ते, सार्वजनिक जागा आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरातील परिसरामध्ये अतिक्रमणामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आले.

या पाहणीवेळी प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष हेमंत मिश्रा, नंदकुमार पाचपोर, चंद्रकांत बोडके, संग्राम साळुंखे, पवन सूर्यवंशी, कमलेश जैन, रितपाल सिंह तसेच सिंधूनगर येथील रहिवासी उपस्थित होते.

“पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. स्वच्छता, अतिक्रमण, रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रशासनाच्या सहकार्याने प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्यासाठी काम केले जाईल”

– शर्मिला राजेंद्र बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर
Next Article धानोरीतील १७० बाधित घरमालकांच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?