Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

पिंपरी : पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या परिसरातील चांगल्या-वाईट घटना, समस्या आणि घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो. हे काम करताना पत्रकार केवळ आपले कर्तव्य पार पाडत असल्याच्या भावनेने कार्यरत असतो. त्यामुळे समाजाच्या या महत्त्वाच्या घटकासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी जाहीर केले.

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ महापालिकेतील भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात उत्साहात पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला फोरम अध्यक्षा अर्चना मेंगडे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

 “पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे तसेच प्रशासनाच्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकार आपले कर्तव्य पार पाडतात. त्यामुळे पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याची सुरक्षितता मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू.”

……. भाऊसाहेब भोईर. विरोधी पक्षनेते,पिंपरी चिंचवड.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी परवडणारी व हक्काची घरे तसेच अन्य कल्याणकारी योजनांसाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत मराठी पत्रकार संघातील पत्रकार सदस्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी दिली. पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून आगामी काळात मराठी पत्रकार संघाच्या लौकिकात भर घालणारे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले. संघांचे उपाध्यक्ष संतलाल यादव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्क प्रमुख संतोष महामुनी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष कालिंदर शेख, संदीप सोनार, श्रीधर जगताप, शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, अजय कुलकर्णी, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील, राजश्री आतकरे, संगीता पाचंगे आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकारांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा असून, आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पत्रकारांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी संघाच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार संतोष महामुनी यांनी मानले.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – आमदार शंकर जगताप
Next Article प्राधिकरण परिसरातील नागरी समस्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?