Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – आमदार शंकर जगताप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे उत्साहात पार पडला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिजित बारणे, आमदार शंकर जगताप, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्याध्यक्ष दादाराव आढाव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्कप्रमुख संतोष महामुनी, संदीप सोनार, शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील, राजश्री आतकरे, संगीता पाचंगे आदी पत्रकार बांधवांचा यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप हे विकासासाठी झटणारे आणि संयमी लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहेत. पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. जनतेची कामे घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात असल्याचे मी अनेकदा पाहिले आहे.”

स्थायी समिती अध्यक्ष अभिजित बारणे यांच्याबाबत बोलताना जोशी म्हणाले की, चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवून चांगल्या कामांना प्राधान्य देणारे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, संघाच्या मुंबई येथील अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार भवनाबाबत दिलेल्या आश्वासनाची पत्राची प्रत आमदार शंकर जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच प्रस्तावित पत्रकार भवनाला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्यात यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी पत्रकार भवनाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. “पत्रकार संघाची मागणी पूर्ण करण्यासाठी निश्चितच मदत करण्यात येईल. जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.

पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी सर्वसमावेशक असून प्रदेशाध्यक्ष किरण जोशी हे पिंपरी-चिंचवड शहराचे राज्यव्यापी प्रतिनिधित्व करत आहेत, ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी परवडणारी व हक्काची घरे तसेच विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी मानले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील १९ पान टपऱ्यांवर कारवाई
Next Article मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?