पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित) यांच्या १८व्या ‘मधुकुंज’ या सचित्र व रंगीत कवितासंग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे करण्यात आले.
‘मधुकुंज’ हा विविध काव्यप्रकारांनी सजलेला संग्रह असून, तो सर्वांगसुंदर व आशयसमृद्ध झाला आहे. या संग्रहासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे शुभेच्छापत्र लाभले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी संग्रहाला आशयघन व प्रासादिक प्रस्तावना दिली आहे. तसेच राजज्योतिषी व लेखक दत्तात्रय अत्रे, माजी शिक्षणाधिकारी कल्याण पानगे, अध्यापिका, लेखिका व कवयित्री शारदा पानगे आणि अध्यापिका कविता खुटवड यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
सौ. सोनाली दीपक मोरे यांनी पुस्तकाचे लेआउट केले असून, दीपक मोरे यांनी उत्कृष्ट पुस्तक बांधणी केली आहे. प्रणाली प्रकाशन, पुणेच्या कु. प्रणाली पंडित यांच्या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती झाली. श्री. दराडे यांनी पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकारले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदिप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, अनिल देवकाते, सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, सचिव अनिल जाचक यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
