Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या –रोहयो मंत्री भरत गोगावले
मुंबई

‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या –रोहयो मंत्री भरत गोगावले

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि.२५ ऑगस्ट : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढविण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. रोजगार हमी विभाग हा सर्वसामान्यांच्या हाताला काम देणारा आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारा महत्त्वाचा विभाग असल्याचे नमूद करत राज्यातील कोणत्याही पात्र नागरिकाला कामाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘व्हीबी जी राम जी’ योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री गोगावले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

मंत्री गोगावले यांनी ‘व्हीबी जी राम जी’ योजनेतील नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी कामे सुरू आहेत, त्या जिल्ह्यांनी तातडीने कामांची संख्या वाढवून नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

या योजनेत आता ३१८ प्रकारची कामे घेण्याची सुविधा उपलब्ध असून यामध्ये घरकुलांसह विविध विकासकामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या कामांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. शाळांमधील कंपाऊंडच्या भिंती, स्वच्छतागृहे, तसेच इतर भौतिक सुविधा निर्माण करण्याची कामेही या योजनेतून हाती घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती निवारण, जलसंधारण, सिंचन विहिरी यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला.

योजनेअंतर्गत मजुरांना काम उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या मजुरीचे वेळेत वितरण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत शासनामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली. निधी उपलब्ध असताना मजुरीचे वितरण प्रलंबित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ई-केवायसी पूर्ण करुनच मजुरांना काम देण्याचे निर्देश देत उपस्थिती व कामांची अचूक नोंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

नरेगा अंतर्गत घरकुलांची प्रलंबित कामे आणि मंजुरी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत मंत्री गोगावले यांनी पंतप्रधान आवास योजनेतील कामांनाही गती देण्याचे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. पीएमएवाय-२ अंतर्गत राज्याला सुमारे २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्याचे जिल्हानिहाय वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सुमारे २८५० कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असून हा निधी लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींना दिलेली उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा, योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. योजनांच्या यशकथांना व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी पुस्तिका तयार करण्यात येणार असून यासाठी सिंचनवाढीची आकडेवारी संकलित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षांचा विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशामला पंडित यांच्या ‘मधुकुंज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Next Article रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?