पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा यांच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व फीत कापून करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार हे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तपदी धीरज पाटील यांची २७ मे २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेचे कामकाज अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यास या स्वतंत्र कार्यालयामुळे मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व अधिकारी व अंमलदारांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, पोलीस उपआयुक्त (झोन-१) संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त (झोन-२) प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त (झोन-३) मारुती जगताप, पोलीस उपआयुक्त (वाहतूक शाखा) विक्रांत देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) सुनील पंधरकर, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) रणजीत पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सुदर्शन राठोड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम, सहायक पोलीस आयुक्त (एमआयडीसी भोसरी विभाग) सुधाकर यादव, सहायक पोलीस आयुक्त (सायबर/आर्थिक गुन्हे शाखा) रोहिणी बाणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कदम (विशेष शाखा-१), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड (विशेष शाखा-२) तसेच विशेष शाखा-१ व विशेष शाखा-२ मधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
