Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
पिंपरी चिंचवड

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 23, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड:….पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांसाठी संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित तिसऱ्या ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ च्या अंतर्गत आज अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात आगमन मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या महोत्सवाच्या प्रास्ताविकात संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके यांनी उपस्थितांचे स्वागत करून महोत्सवाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.गावाकडून शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कानबाई महोत्सव साजरा होत असल्याबद्दल उपस्थितांनी मनमोकळा आनंद व्यक्त केला. आज पार पडलेल्या कानबाई उत्सवाच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड नगरीत आनंदाचे व भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.

कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार आहे. एवढ्या दूर राहूनही आपल्या मातीची संस्कृती आणि परंपरा येथील खानदेशवासीयांनी अत्यंत उत्साहात कायम राखल्याचा आणि देश-विदेशातही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

आज, रविवार (२३ ऑगस्ट) रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथून शुभम गार्डन, वाल्हेकरवाडीपर्यंत कानबाई माता आगमन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिरपूरची प्रसिद्ध ‘गोल्डन बँड’ आणि अमळनेरची ‘राधेकृष्णा बँड’ विशेष आकर्षण ठरली. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन तर पुरुषांनी पारंपरिक वेषात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना, कानबाई माता पूजन आणि उत्सव उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याचवेळी मान्यवरांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडला. रात्री ८ वाजल्यापासून भाविकांसाठी मातांचे दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत खानदेश फ्रेंड सर्कल ग्रुप (शिरपूर, धुळे, पुणे) चे कलाकार तसेच लोकप्रिय गायक सागर देशमुख, दिलीप बाशिंगे, कुणाल महाराज आणि दिनेश बाशिंगे यांच्या उपस्थितीत कानबाई मातेच्या गाण्यांचा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगला, ज्याने रसिकांची मने जिंकली.

उद्या, सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत या मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिरपूरच्या ‘गोल्डेन बँड’च्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खानदेश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, आहिरे मराठा मंडळ, बारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खानदेश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ आणि कानबाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांसह शहरातील सर्व समाजबांधव सहआयोजक म्हणून सक्रिय सहभाग घेत आहेत.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleह्यूमन राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांचा सन्मान
Next Article विश्वबंधुत्व दिनानिमित्त रहाटणीत महा रक्तदान शिबिर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?