पुणे,किवळे प्रतिनिधी : सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, आदर्शनगर, किवळे-रावेत यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, नगरसेवक राजेंद्र तरस, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नगरसेवक निलेश तरस, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, महासंघाचे सचिव ईश्वरलाल चौधरी तसेच सहसचिव पंढरीनाथ सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तसेच सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यावर चर्चा करण्यात आली. सामाजिक आणि मानवाधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एम. डी. चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वर्धापन दिन सोहळ्यास परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
