Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»अमली पदार्थविरोधी कारवाईत १५२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ११० किलो गांजा व १७८ ग्रॅम चरस जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

अमली पदार्थविरोधी कारवाईत १५२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ११० किलो गांजा व १७८ ग्रॅम चरस जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाईचा धडाका कायम ठेवत बावधन, हिंजवडी आणि सांगवी परिसरात केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा व चरस जप्त केला. या कारवायांमध्ये तिघांना अटक करण्यात आली असून, एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

बावधनमध्ये हायड्रोपोनिक गांजा जप्त….

बावधन पोलिसांनी सुस-नांदे रोडवरील ब्लुरिफमेरा सोसायटीसमोर, कनुकी चायजवळ २१ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास कारवाई केली. यावेळी सचिनकुमार दयानंद प्रसाद (वय २३, रा. सुस) याच्याकडून १५२ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे १५ लाख २० हजार रुपये आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी कुणाल रंजन याने विक्रीसाठी हा गांजा सचिनकुमार याच्याकडे दिला होता. या प्रकरणी सचिनकुमार याला अटक करण्यात आली असून, कुणाल रंजन याचाही तपास सुरू आहे. बावधन पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीत गांजासह तरुणाला अटक…..

हिंजवडी पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास व्ही.टी.पी. बांधकाम साइटजवळ, महाळुंगेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर कारवाई केली. गणेश राजेंद्र पवार (वय २४, रा. माण, मुळशी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडून गांजा आणि एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या नोंदीनुसार गांजाचे वजन ११० किलो असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सांगवीत चरस जप्त; मनाली-कसोल कनेक्शन उघड

सांगवी पोलिसांनी पिंपळे गुरव येथील शिवगणेश चौक, पगारे हॉस्पिटलसमोर २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारवाई केली. प्रथमेश ऊर्फ सनी राजेश खेरे (वय २५, रा. पिंपळे गुरव) याला अटक करून त्याच्याकडून १७८ ग्रॅम ३७० मिलीग्रॅम चरस जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून चरससह दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण सुमारे २ लाख ४ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत हा चरस हिमाचल प्रदेशातील मनाली-कसोल परिसरातून विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात आरोपीने मित्रांसह मनाली-कसोल येथे जाऊन तेथून चरस आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.तीन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे. अमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleव्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Next Article चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन’ मोड मध्ये
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?