Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शहरातील ज्येष्ठ नागरिकांची उपमहापौर बाबर यांच्याकडे मागणी; अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले निर्देश

पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट घेतली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत उपमहापौर बाबर यांनी ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेतली आणि जलतरण तलाव सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

यावेळी उपायुक्त पंकज पाटील, ज्येष्ठ नागरिक कैलास तापकीर, डॉ. चंद्रकांत चौधरी, शिवाजी आढाव, प्रमोद शहाणे, राजेंद्र पोतदार, अनिल पवार, मापारी शांतीलाल आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहरातील सर्व जलतरण तलाव सध्या बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जलतरण हा आरोग्य आणि व्यायामासाठी उपयुक्त असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून तलाव लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, पवना धरण १०० टक्के भरले असून शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही सुटला आहे. त्यामुळे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सर्व १३ जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्याची सूचना उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे केली.

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या सूचनेची अतिरिक्त आयुक्त जंगम यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी उपायुक्त पंकज पाटील यांना शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.

जलतरण तलाव सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभाजप पिंपरी-चिंचवडच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे यांची नियुक्ती
Next Article अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?