Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भाटनगर पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्रींकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांचे निवेदन
पिंपरी चिंचवड

भाटनगर पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्रींकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांचे निवेदन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 SRA मार्फत तातडीने प्रस्ताव सादर करण्याची मागणी

पिंपरी, दि. ०७ ऑगस्ट….पिंपरी-चिंचवड शहरातील भाटनगर (सर्व्हे क्र. १७, पिंपरी) येथील ३३ वर्षांहून अधिक जुन्या, मोडकळीस आलेल्या व धोकादायक पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मार्फत पुनर्विकास करण्यात यावा, यासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १९८७ ते १९९१ या कालावधीत भाटनगर येथे तत्कालीन झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी १७ इमारती उभारल्या होत्या. या इमारतींमध्ये आजही शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर या इमारती अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या असून रहिवाशांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

महापालिकेने केलेल्या Structural Audit मध्ये संबंधित इमारती राहण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. तथापि, विद्यमान नियमांमध्ये पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्पष्ट तरतूद नसल्याचे सांगत पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाच्या निर्णयाची आवश्यकता असल्याचे संबंधित यंत्रणांनी नमूद केले आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, या इमारतींची परिस्थिती आज झोपडपट्टीपेक्षाही अधिक दयनीय झाली असून त्या प्रत्यक्षात ‘Vertical Slum’ मध्ये परिवर्तित झाल्या आहेत. संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक झालेल्या या इमारतींमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या जीविताला कायमस्वरूपी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक घरे उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे.

महापालिकेने या प्रकरणात आवश्यक जुने अभिलेख, कागदपत्रे व सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर SRA मार्फत पुनर्विकास प्रक्रिया राबविता येईल, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईतील सुमारे एक हजार जुन्या पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अशाच धोकादायक पुनर्वसित इमारतींनाही समान न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, निळ्या पूररेषेतील अधिकृत प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-2020) मधील विनियम क्र. ३.१.३(अ) अंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतुदींचा विचार करून या प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“भाटनगरमधील नागरिक गेली अनेक वर्षे भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. शासनाने मुंबईप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील जुन्या पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासालाही तातडीने मंजुरी द्यावी. SRA मार्फत प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवून या कुटुंबांना सुरक्षित व सन्मानजनक घरे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.”

…… संदीप वाघेरे.नगरसेवक, पिंपरी चिंचवड 

या मागणीला स्थानिक रहिवाशांकडूनही मोठा पाठिंबा मिळत असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन भाटनगरमधील शेकडो कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात वाकडचे सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा मृत्यू
Next Article भाजप पिंपरी-चिंचवडच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे यांची नियुक्ती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?