Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»अवैध दारू व्यवसायाविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा दणका; तीन सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

अवैध दारू व्यवसायाविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा दणका; तीन सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध दारू व्यवसाय आणि सराईत गुन्हेगारीविरोधात कठोर पाऊल उचलत तीन अट्टल गुन्हेगारांना महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित प्रस्तावांची पडताळणी करून ही कारवाई केली.

स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय ३७, पिंपळे गुरव), जीवन मारुती राजपूत (वय ४८, गोनवडी, ता. खेड) आणि धनराज सोमाजी नट (वय ३५, हिंजवडी) यांचा समावेश आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडीबा कांबळे याच्यावर अवैध दारू विक्रीचे नऊ गुन्हे दाखल असून, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवन राजपूत याच्यावर गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री केल्याचे १४ गुन्हे नोंद आहेत. तर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनराज नट याच्यावर अवैध गावठी दारू विक्रीचे चार गुन्हे दाखल आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार कोंडीबा कांबळे आणि जीवन राजपूत यांना हरसूल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर, तर धनराज नट याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध दारू व्यवसाय आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबिले असून, अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. समाजाच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अवैध दारू माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावर्षी जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत एमपीडीए कायद्यांतर्गत ११ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, २०२५ मध्ये अशा ३५ कारवाया करण्यात आल्या होत्या. या कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी, हिंजवडी, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.

Post Views: 22
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जय्यत तयारी; भाजपची विशेष बैठक
Next Article “आनंदाश्रू कौतुकाचे – सावित्रीचा वसा घेऊन”
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?