Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिवसात ९ गुन्ह्यांची नोंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिवसात ९ गुन्ह्यांची नोंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जबरी चोरी, सायबर फसवणूक, घरफोडी आणि अवैध शस्त्रप्रकरणे

पिंपरी, दि. ४ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते रात्री १२ या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये जबरी चोरी, सायबर फसवणूक, घरफोडी, मारहाण, वाहन चोरी तसेच अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यांचा समावेश आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात पवनानगर-रहाटणी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडून तीन हजार रुपये लुटून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ५०.९४ लाख रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या खात्यात २८ हजार २८० रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात राजस्थानमधील एनसीसीआरपी तक्रारीशी संबंधित सायबर फसवणुकीच्या प्रकरणात एक लाख रुपयांची रक्कम आरोपीच्या खात्यावर जमा करून एटीएममधून काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहुंजे येथील एका घरातून तब्बल २१ लाख २५ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून त्यांच्या जागी बनावट दागिने ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून कारचालक, त्याचे कुटुंबीय आणि हॉटेल कर्मचाऱ्याला लाकडी दांडके व सिमेंट ब्लॉकने मारहाण करून हॉटेलवर दगडफेक करण्यात आली.

चिखली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली. पहिल्या प्रकरणात पार्किंगमध्ये झालेल्या वादातून छत्रीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या कारवाईत एका तरुणासह एका विधीसंघर्षित बालकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करून दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगमधून दहा हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनाई आदेश असताना धारदार कोयता बाळगल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाविरुद्ध आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करीत आहेत.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी होणार – महापौर रवि लांडगे
Next Article परराज्यातील मजुरांना लुटणारी टोळी जेरबंद; जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड, दोन सराईत आरोपी अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?