Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी होणार – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी होणार – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच संबंधित अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

बैठकीत यापूर्वीच्या पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, त्रुटी, त्यामागील कारणे तसेच त्यावरील उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, नागरिकांना सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापारी भाग, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा मांडला. तसेच शहराच्या विविध भागांतील पार्किंगची सद्यस्थिती, उपलब्ध जागा, भविष्यातील गरजा आणि नियोजनाबाबत आवश्यक सूचना व प्रस्तावही सादर करण्यात आले.

 “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनविण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकाभिमुख आणि व्यवहार्य पार्किंग व्यवस्था उभारावी.

– महापौर रवि लांडगे, पिंपरी चिंचवड 

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा चार प्रकारांत वेगळा करण्याचे नागरिकांना आवाहन
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिवसात ९ गुन्ह्यांची नोंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?