Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»१५० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात मोशीतील तरुण अटकेत
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

१५० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात मोशीतील तरुण अटकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

६५ नागरिकांची फसवणूक, ९ बँक खात्यांतून १.१५ कोटींचे व्यवहार

पिंपरी, दि. ४ ऑगस्ट : देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट व इतर ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्यातील सायबर सेल म्युल (Mule) बँक खात्यांचा तपास करत असताना आरोपी स्वतःच्या बँक खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करत असल्याची माहिती मिळाली.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ आणि २८३/२०२६ असे दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११२(२), ६१(१), ३१८(४) व ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान आरोपीने स्वतःच्या नावावर विविध बँकांमध्ये एकूण नऊ बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतील रक्कम जमा करून ती एटीएम व धनादेशाच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे समोर आले.

एनसीसीआरपी (NCRP) पोर्टलवरील माहितीनुसार, देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळले. यापैकी आरोपीच्या नऊ खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यानंतर सचिन काळे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशीकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, महिला पोलीस हवालदार आरती निकम तसेच पोलीस शिपाई सोळंके व जगताप यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, आपले बँक खाते किंवा सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. तसेच अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन स्वरूपात पैसे स्वीकारून ते एटीएम किंवा धनादेशाद्वारे काढून देण्याचे प्रकार टाळावेत. अशा रकमा सायबर फसवणुकीतील असण्याची शक्यता असते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगाचा अस्त
Next Article पीएमपीएमएलची ‘वर्षा सहल’ पर्यटन बस सुरू; मुळशी-पळसे धबधब्याच्या निसर्गरम्य सफरीचा पुणेकरांना आनंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?