भोसरी एमआयडीसी| प्रतिनिधी….आरबीएल बँकेतील खाते वापरून इतर साथीदारांच्या मदतीने संघटित पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात देशभरात एकूण १५ तक्रारी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील घटना ५ मार्च २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आरबीएल बँक, गोडाऊन क्रमांक ११४ व ११५, एमडी बाबर बिझनेस सेंटर, प्लॉट नं. बीजीपी-१०९, एमआयडीसी लांडेवाडी, भोसरी, पुणे परिसराशी संबंधित आहे.
या प्रकरणी आनंद किसन जाधव, पोलीस शिपाई क्र. ३५७२, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश शिवराज कदम, रा. अवनी निवास, फ्लॅट नं. १००२, डी विंग, दहावा मजला, कोतवालवाडी, चऱ्होली-दिघी, पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने RBL Bank Account No. ३०९०३०७३८४९६ हे खाते उघडून त्याचा वापर इतर साथीदारांसह संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने आर्थिक व्यवहार करण्यासाठी केल्याचा आरोप आहे. या खात्याशी संबंधित व्यवहारांच्या तपासादरम्यान भारतातील विविध ठिकाणी एकूण १५ तक्रारी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहे.