Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाची जोड; ‘शक्ती आणि सुरक्षा’ राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड

महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाची जोड; ‘शक्ती आणि सुरक्षा’ राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.२७ जुलै : महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, तंत्रशुद्ध आणि प्रभावी व्हावा तसेच दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने “शक्ती आणि सुरक्षा : सायबर गुन्ह्यांविरुद्ध पोलिसिंग” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यशाळा सोमवारी डी. वाय. पाटील महाविद्यालयात उत्साहात पार पडली. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), अतिरिक्त पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग), महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहरचे सहपोलीस आयुक्त संजय दराडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप गिल तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना विजया रहाटकर यांनी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांशी संवेदनशीलतेने व आदरपूर्वक वागून त्यांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत माजी प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान यांनी महिला, पुरुष आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये समान दृष्टीकोन ठेवून निष्पक्ष तपासाचे महत्त्व स्पष्ट केले. विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी महिलांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, डिजिटल पुराव्यांचा प्रभावी वापर, सायबर तपासातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच महिलांनी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी संजय तुंगार आणि सागर पानमंद यांनी डिजिटल फॉरेन्सिक, आधुनिक तपास पद्धती आणि तंत्रज्ञानाधारित तपास याविषयी सविस्तर माहिती दिली. तर डॉ. उमा सुब्रमण्यम यांनी पीडित-केंद्रित तपास पद्धतीची गरज आणि त्यातील संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.

मान्यवरांनी महिलांविरुद्धच्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास अत्याधुनिक तंत्रज्ञान, संवेदनशीलता आणि व्यावसायिकतेच्या आधारे करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे तपासाची गुणवत्ता उंचावून पीडितांना जलद व प्रभावी न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे व त्यांच्या पथकासह राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्वयक सर्वेश पांडे यांनी विशेष योगदान दिले. तसेच सुसज्ज सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे व्यवस्थापन, कॅम्पस संचालक तेजस पाटील, निवृत्त रिअर ॲडमिरल अमित विक्रम आणि राहुल कडू यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Post Views: 54
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण
Next Article घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अवघ्या ६ तासांत अटक; गावठी पिस्तूल, काडतुसे आणि ₹१.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?