Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
शहराच्या भविष्यातील विकासाला पूरक नियोजनावर भर

पिंपरी, दि. २७ जुलै २०२६ :- “पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वेग लक्षात घेता मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे, तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात,” असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले.

महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे,महेश लांडगे,शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठीया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महामेट्रो आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केले. महामेट्रोकडून मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादर करण्यात आला. प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी शहरातील नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसर, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्रे तसेच प्रमुख वाहतूक मार्गांना मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि शहराच्या विस्तारणाऱ्या सीमांचा विचार करून डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या.

मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बस सेवा, पार्किंग, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ यांचा प्रभावी समावेश असावा, अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळण्यास तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुलभता निर्माण होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

“पिंपरी-चिंचवड हे देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आगामी काळातील लोकसंख्या, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार तसेच नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे. आजच्या गरजांसोबतच पुढील अनेक दशकांचा विचार करून तयार होणारे मेट्रो नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईल. त्यामुळे डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारावा.”

……रवी लांडगे.महापौर पिंपरी चिंचवड

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार
Next Article महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाची जोड; ‘शक्ती आणि सुरक्षा’ राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?