Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार
पिंपरी चिंचवड

शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २७ जुलै २०२७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गट यांना ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार आसरा सोशल फाऊंडेशन, पुणे आणि ओम पब्लिकेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित ‘उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – २०२६’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी बचत गटाला अभिनेते विजय गोखले व प्रसिद्ध साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर तसेच अश्विनी चौधरी यांनी हा सन्मान स्विकारला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टी भागांमध्ये स्वच्छता, कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाला चालना देणे तसेच परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ या प्रकल्पास १६ ऑगस्ट २०२२ रोजी सुरूवात झाली. हा प्रकल्प देशातील पहिला शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प असून यामध्ये स्थानिक महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे. त्यांच्यामार्फत घराघरांत जनजागृती, कचरा वर्गीकरण, संकलन आणि परिसरातील स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

या प्रकल्पाची सुरुवात गवळीमाथा झोपडपट्टी परिसरात करण्यात आली होती. या ठिकाणी श्रीकृष्ण महिला बचत गटाने अत्यंत जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. घराघरांत जाऊन कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती, नियमित कचरा संकलन, स्वच्छता राखणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे या कामांमध्ये बचत गटाने उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे या उपक्रमाला यश मिळाले असून इतर झोपडपट्टी भागांसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी ठरला आहे.

महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याची दखल घेत श्रीकृष्ण महिला बचत गटाला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

“स्वच्छ शहर, निरोगी पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमात महिला बचत गटांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका विशेष उल्लेखनीय असून त्यांनी केवळ कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविले नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा, समर्पणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना अशा महिला बचत गटांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हा सन्मान इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे”

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा’ उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल अत्यंत अभिमानास्पद आहे. ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अनुकरणीय आहे. स्थानिक महिला बचत गटांच्या सहभागातून शून्य कचरा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतो, हे श्रीकृष्ण महिला बचत गटाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“स्वच्छता ही केवळ नागरी सुविधा नसून सार्वजनिक आरोग्याचा भक्कम पाया आहे. ‘शून्य कचरा’ उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, योग्य संकलन व वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. परिणामी दुर्गंधी, डास व माश्यांची उत्पत्ती कमी होऊन विविध संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागतो. श्रीकृष्ण महिला बचत गटाने गवळीमाथा परिसरात अत्यंत समर्पितपणे काम करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली आणि लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने झालेली दखल ही संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब आहे”

– डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उपक्रम हा केवळ स्वच्छता अभियान नसून नागरिकांचा सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण यांचा प्रभावी संगम आहे. श्रीकृष्ण महिला बचत गटाने गवळीमाथा परिसरात अत्यंत समर्पित भावनेने काम करत नागरिकांमध्ये कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला असून त्याचे सकारात्मक परिणाम परिसरात दिसून येत आहेत. ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ हा पुरस्कार त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल आहे. हा सन्मान संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आणि विशेषतः झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि शहरातील अधिकाधिक झोपडपट्टी भाग शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल करतील, असा आम्हाला विश्वास आहे”. 

– अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक,कवी,साहित्यिक तसेच अभिनेते व दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा मानपत्र देऊन गौरव
Next Article महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?