Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अवघ्या ६ तासांत अटक; गावठी पिस्तूल, काडतुसे आणि ₹१.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अवघ्या ६ तासांत अटक; गावठी पिस्तूल, काडतुसे आणि ₹१.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (प्रतिनिधी): काळेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत दोन सराईत चोरट्यांना आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून ₹१,०८,९७० किमतीचा चोरीचा मुद्देमाल, एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जुलै २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू व इतर साहित्य चोरी करून पसार झाले होते. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे क्रमांक ३१४/२०२६ आणि ३१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार कैलास अशोक खलसे (वय ४०, रा. भारतनगर, पिंपरी) आणि शुभम शांताराम दुबे (वय २७, रा. अदिनाथ कॉलनी, थेरगाव) यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याशिवाय आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गुरव तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाची जोड; ‘शक्ती आणि सुरक्षा’ राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
Next Article उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायबर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 3, 20260

निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील घटना; सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध पिंपरी : रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला…

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?