Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मुंबईच्या धर्तीवर निगडी सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांना मालमत्ता करात मिळणार सवलत
पिंपरी चिंचवड

मुंबईच्या धर्तीवर निगडी सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांना मालमत्ता करात मिळणार सवलत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नगरसेवक प्रा उत्तम केंदळे आणि नगरसेवक बापू घोलप यांच्या उपसूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत ठराव

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि. २७ जुलै २०२६: पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्र. २२, निगडी येथील जेएनएनयुआरएम (JNNURM) अंतर्गत पुनर्वसित झोपडपट्टीधारकांना मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर मालमत्ता करामध्ये सवलत मिळणार आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी विधानसभेत केलेल्या मागणीला आता स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक प्रा उत्तम केंदळे आणि नगरसेवक बापू घोलप यांचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी महानगरपालिकेतील आज (दि.२७) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला आहे.राज्य शासनाकडे यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन आहे.आमदार महेशदादा लांडगे यांनी यापूर्वी विधानसभेत चिखली घरकुल तसेच ईडब्ल्यूएस (EWS) आणि पुनर्वसन योजनांतील रहिवाशांना करामध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शासन स्तरावर सुध्दा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रा उत्तम केंदळे आणि नगरसेवक बापू घोलप यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सेक्टर क्र. २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये महानगरपालिका अधिनियमातील कलम १२९(१-अ) चा उल्लेख करण्यात आला असून, विशेष विकास प्रकल्पांतील इमारती व जमिनींवर राज्य शासनाच्या मान्यतेने कमी दराने मालमत्ता कर आकारण्याची स्पष्ट तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रा उत्तम केंदळे यांनी सांगितले की,सध्या सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांवर प्रचलित दराने मालमत्ता कर आकारला जात आहे. मात्र, या परिसरातील बहुतांश कुटुंबे पूर्वीची झोपडपट्टीधारक असून मोलमजुरी, कष्टाची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांच्यावर पडणारा मालमत्ता कराचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सवलत देणे आवश्यक आहे.यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील पुनर्वसन प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना राज्य शासनाच्या मंजुरीने सवलतीच्या दराने मालमत्ता कर आकारला जात आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील जेएनएनयुआरएम, बीएसयूपी (BSUP), एसआरए (SRA), ईडब्ल्यूएस आणि इतर पुनर्वसन योजनांतील रहिवाशांनाही समान न्याय मिळणार आहे.

नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे आणि नगरसेवक बापू घोलप यांनी या संदर्भात महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून तातडीने मंजुरी मिळवावी, अशी विनंती केली आहे. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सेक्टर क्र. २२ मधील सुमारे ३,४४० आणि शहरातील सर्वच पुनर्वसित घरांवरील मालमत्ता कराचा भार कमी होऊन हजारो नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या प्रस्तावाला राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील पुनर्वसन योजनांतील नागरिकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार असून, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक आधार देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Post Views: 18
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल – शंभर टक्के यशाची परंपरा कायम
Next Article पुणे मेट्रो टप्पा-२ ला वेग; भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित डीपीआर सादर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?