Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

हजारो वारकरी श्रमिकांचा सहभाग

पिंपरी | प्रतिनिधी ……आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ व वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. सलग दुसऱ्या वर्षी काढण्यात आलेल्या या दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अबोलीताई पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना भक्त पुंडलिकाच्या आदर्शाचे स्मरण करून, “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन केले.

संत तुकाराम नगर येथील पुतळ्यापासून सुरू झालेली सुमारे तीन किलोमीटरची दिंडी महेशनगर, वल्लभनगर, गंगानगर परिसरातून विविध मंदिरांना प्रदक्षिणा घालत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंग, वीणा, अभंग आणि पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या नृत्यामुळे वातावरण भक्तिमय झाले.

दिंडीतील विशेष आकर्षण म्हणजे संतांच्या वेशभूषेत सजलेल्या लहान मुलांचा सुशोभित रथ. विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची रूपे साकारलेल्या बालवारकऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. नागरिकांनी मार्गभर फुलांचा वर्षाव व रांगोळ्यांनी दिंडीचे स्वागत केले.

दिंडीचे संपूर्ण नियोजन यशवंतभाऊ भोसले यांनी स्वतः लक्ष घालून केले. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक, शिस्त व सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टप्प्यावर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात वारकरी परंपरेतील संस्कार, श्रमिकांचे समाजातील योगदान आणि यशवंतभाऊ भोसले यांच्या सामाजिक, धार्मिक व श्रमिक चळवळीतील कार्याचे कौतुक केले.

दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओमकार देशपांडे, ओंकार जोखारे, अप्पू नायर, अंकुश वाघमारे, मानसी देशपांडे, आरती पराळे, इस्मात सय्यद, शालन महापुरे, संतोषी चौधरी, गणेश बुलदगड, विनायक निकम, श्रेयस करे, मल्लेश पोरवी, फौजदार गायकवाड, आप्पासाहेब माने, महेश भुते, सुधाकर शिंदे, सतीश सासवडे तसेच संत तुकाराम नगर सहकारी रचना मर्यादितचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद यांनी परिश्रम घेतले.

वारकरी श्रमिक मेळाव्याचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानातून नागरिकांना २९ शासकीय सेवा एकाच छताखाली – अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात
Next Article राजवाडा अप्पर तहसीलदार कार्यालय परिसर त्वरित स्वच्छ करा; ह्यूमन राइट्स असोसिएशनची जोरदार मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?