Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»राज्यभरात दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन
महाराष्ट्र

राज्यभरात दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राजभवन, विधानभवन आणि मंत्रालयात पुष्पांजली

मुंबई, दि. २२ जुलै : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध शासकीय ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. राजभवन, विधानभवन आणि मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी-अंमलदार उपस्थित होते.

विधानभवनात आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, सहसचिव राजेश तारवी, उपसचिव विजय कोमटवार, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक तसेच जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

मंत्रालयातही जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजीराव गर्जे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिखलीत स्पाईन रोडवरून पार्क केलेली अ‍ॅक्टिव्हा चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कृतज्ञतापूर्वक अभिवादन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?