Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देऊन अडचणींचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व विक्रांत बगाडे तसेच सर्व संबंधित विभागप्रमुख व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पूर, अतिवृष्टी, आग, इमारत दुर्घटना व इतर नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम केली असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात इन्सिडेंट कमांडर आणि सब-इन्सिडेंट कमांडर नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांवर आपत्तीपूर्व तयारी, संवेदनशील भागांचे सर्वेक्षण, मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता, विविध विभागांतील समन्वय, शोध व बचाव कार्याचे नेतृत्व, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पायाभूत सुविधांची तांत्रिक पाहणी तसेच आपत्तीनंतर पुनर्स्थापना कामांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या व्यवस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसादाचा वेग वाढून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे अधिक प्रभावी संरक्षण होणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील पाणी साचणे, नाले तुंबणे व पूरस्थिती निर्माण झालेल्या संवेदनशील ठिकाणांची सखोल पाहणी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांवर सातत्याने पाहणी करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक अधिकार व जबाबदाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, स्थानिक स्तरावर तातडीने निर्णय घेऊन जलद प्रतिसाद देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.पाणी साचणे किंवा पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. नाल्यांमधील अडथळे दूर करणे, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे, आवश्यक त्या ठिकाणी डी-वॉटरिंग पंप उपलब्ध ठेवणे तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ‘आपदा मित्र’ यांची विविध संवेदनशील ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांना तातडीने मदत करणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि बचावकार्यात सहकार्य करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

महानगरपालिकेचा अग्निशमन विभागही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आला आहे. शहरातील सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी २४ तास सतर्क असून, रेस्क्यू बोटी, लाइफ जॅकेट, लाइफ बॉय, दोरखंड, डी-वॉटरिंग पंप तसेच अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे. पाणी साचणे, पूरस्थिती, झाडे पडणे, भिंती कोसळणे अथवा नागरिक अडकून पडल्याच्या घटनांमध्ये तातडीने मदत व बचावकार्य करण्यासाठी विशेष पथके सज्ज आहेत.शहरातील पर्जन्यमानासह पवना धरण परिसरातील पावसाच्या नोंदींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून धरणातून होणारा विसर्ग, नदीपात्रातील पाणीपातळी आणि त्याचा शहरावर होणारा संभाव्य परिणाम याचे नियमित विश्लेषण केले जात आहे. पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना वेळेत पूर्वसूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.

महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून अग्निशमन, आरोग्य, यांत्रिकी, विद्युत, पाणीपुरवठा तसेच इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महानगरपालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पाणी साचणे, झाड पडणे, पूरस्थिती किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, जवळच्या अग्निशमन केंद्राशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. सर्व विभागांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
Next Article आकाशचिन्ह व परवाना विभाग ‘ॲक्शन’ मोडवर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?