Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अखंडित वीजपुरवठ्यासाठी तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी-चिंचवड….शहरातील नागरिकांना अखंडित, दर्जेदार व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, महापालिकेच्या पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना आवश्यक वीजजोडणी वेळेत उपलब्ध व्हावी तसेच महावितरणकडे प्रलंबित असलेल्या विविध कामांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.

बैठकीत रावेत परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रे (WTP), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), जॅकवेल व पंप हाऊससाठी आवश्यक नवीन वीजजोडण्या, ट्रान्सफॉर्मर उभारणी, डीपी, फीडर पिलर, आरएमयू, मीटर बसविणे, अंदाजपत्रके मंजुरीतील विलंब, डबल रन केबल, पीडी मीटर, वीजबिलाशी संबंधित तक्रारी, रस्ते खोदाईनंतरचा समन्वय तसेच विविध प्रलंबित प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महापालिकेच्या विकासकामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही यासाठी महावितरणने आवश्यक तांत्रिक मंजुरी व अंदाजपत्रके वेळेत उपलब्ध करून द्यावीत, नवीन वीजजोडण्या आणि ट्रान्सफॉर्मरची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

तसेच नागरिकांच्या वीजपुरवठा, मीटर, बिलिंग व इतर तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, रस्ते खोदाईपूर्वी महापालिकेशी समन्वय साधावा, कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही वेळेत करावी आणि भविष्यात अशा समस्यांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

महापौर रवि लांडगे यांनी शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून महावितरणने अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक वीजविषयक मंजुरी, वीजजोडण्या आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. महापालिका आणि महावितरण यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून नागरिकांना विश्वासार्ह वीजसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता लहानू विश्वनाथ तसेच महावितरणचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण….’नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
Next Article पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?