Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत मंडळांसाठी कार्यशाळेचे २३ जुलै रोजी आयोजन
महाराष्ट्र

गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत मंडळांसाठी कार्यशाळेचे २३ जुलै रोजी आयोजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई दि.२० जुलै : महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने मागील वर्षीपासून ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिला आहे. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या विस्तारामुळे, राज्यासोबतच देशभरात व जगभरात विविध ठिकाणी जी सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे साजरे करतात त्यांना देखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, त्यांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून, त्यांच्या उपक्रमांना भरघोस बक्षिसांच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील लाभणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या २३ जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ह्यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.

या वर्षीच्या महागणेशोत्सव उपक्रमांचा शुभारंभाही यानिमित्ताने होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव विधायक उपक्रमांसह शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी उत्सवांचा इतिहास, उत्सव आणि सामाजिक भान,आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, विधायक स्वरूपातील कार्यकम संयोजन, नेतृत्व विकास या विषयांवर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात मुंबईतील ज्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्या केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळाच्या शतकोत्तर वाटचालीचा मार्गदर्शनपर आढावा घेण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषा, मराठी संस्कृती, विकसित भारताच्या संकल्पनेतील ‘वसुधैव कुटुम्बकम’ या उक्तीप्रमाणे असणारी वैश्विक कल्याणाची भावना यांचा प्रचार व प्रसार, मूल्याधारित सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांना बळकटी इत्यादी साध्य करणे अपेक्षित आहे.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुल येथे सकाळी १० ते सायं ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अकादमीच्या यूट्युबवाहिनीवर उपलब्ध करून देण्यात येईल. जगभरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून करण्यात येत आहे.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
Next Article माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते ३१ जुलैदरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहिम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?