Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस
पिंपरी चिंचवड

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न

पत्रकार रोहित खर्गे ‘भला माणूस ‘ पुरस्काराने सन्मानित

पिंपरी ….. ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानवमुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके

यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्योजक आणि कृषिभूषण सुदाम भोरे यांच्या सहधर्मचारिणी वर्षा भोरे (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी बनसोडे परुळेकर (पद्मश्री नारायण सुर्वे विचारसाधना पुरस्कार), कवी राजू जाधव (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘नारायण सुर्वे हे संस्कृतीच्या शहाणपणाला मौनात पाठविणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीनंतरही सांस्कृतिक शहाणपण आले आहे की नाही, हा प्रश्न पडतो. जन्मापासून अन्याय सोसूनही त्यांच्या कवितेत कडवटपणा आला नाही; याउलट त्यांनी मातृत्वाचा गौरवच केला आहे!’ सत्काराला उत्तर देताना प्रा. सुरेखा कटारिया यांनी, ‘पारंपरिक संस्कारांच्या कुटुंबात वावरताना सहजीवनाचा अनुभव घेतला. विवाहानंतर स्वत: उच्च शिक्षण घेतले आणि मुलांनाही उच्चशिक्षित केले. जगण्यातला स्वानंद घेत असतानाच त्यात समाजालाही सामावून घेतले!’ अशी भावना व्यक्त केली. वर्षा भोरे यांनी, ‘मोठ्या एकत्र कुटुंबात स्वतःला उन्हात झाड बनून उभे राहावे लागते, अशी शिकवण आईवडिलांनी दिली!’ असे नमूद केले; तर रोहित खर्गे यांनी, ‘आजपर्यंत जीवनात नि:स्वार्थी मित्रांमुळे स्वाभिमानाने जगलो. त्यामुळे हा पुरस्कार मित्रांचाच आहे!’ अशी कृतज्ञता व्यक्त केली. पल्लवी बनसोडे यांनी, ‘प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते!’ याची ग्वाही दिली; तर राजू जाधव यांनी, ‘कोणत्याही कामाची कधी लाज बाळगली नाही!’ अशी प्रांजळ कबुली दिली. भाऊसाहेब भोईर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘बुद्धीने श्रीमंत होता येते; पण श्रीमंतीने बुद्धिवंत होता येत नाही. नारायण सुर्वे मला प्रेमाने ‘पोट्ट्या’ म्हणत, ही श्रीमंती कशातही मोजता येत नाही!’ असे मत मांडले.

बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविकातून कविवर्य सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतील हे दहावे पुष्प आहे, अशी माहिती दिली. नारायण सुर्वे काव्यजागर कविसंमेलनात राजेंद्र वाघ, जयश्री श्रीखंडे, प्रभाकर वाघोले, स्वाती भोसले, सीमा गांधी यांनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करून दाद मिळवली. संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून हितगुज केले. कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक शिक्षिकेसह प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला; तसेच नियोजित सोळाव्या स्वानंद साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, महेंद्र भारती, प्रा. प्रभाकर दाभाडे, कुमार खोंद्रे, सुप्रिया सोळांकुरे, प्रदीप गांधलीकर आणि स्वानंद महिला संस्थेचे पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनीट परीक्षा घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जवाब दो’ आंदोलन
Next Article पुणे गणेशोत्सवात झळकणार श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?