Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘एसआयआर’ अन्‌ संघटनात्मक कामगिरी ठरणार निर्णायक! 
पिंपरी चिंचवड

‘एसआयआर’ अन्‌ संघटनात्मक कामगिरी ठरणार निर्णायक! 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्यांसाठी भाजपाचे ‘‘निकष’’;२७ ते ३० जुलैदरम्यान ३० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या अपेक्षित;भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची माहिती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी.….पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग समित्यांवरील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी भारतीय जनता पक्षाने स्पष्ट निकष जाहीर केले असून, ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेतील कामगिरी आणि पक्षासाठी केलेले संघटनात्मक योगदान हेच निर्णायक ठरणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांवर एकूण ३० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती दि. २७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत होण्याची शक्यता असून, त्यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

यासंदर्भात शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी दि. १८ जुलै २०२६ रोजी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात लिखित अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, प्रभाग क्रमांक, पक्षातील कार्याचा कालावधी, शैक्षणिक पात्रता, संपूर्ण रहिवासी पत्ता आदी माहिती नमूद करणे बंधनकारक राहणार आहे.

विशेष म्हणजे, इच्छुक कार्यकर्त्यांनी दि. २५ जुलै २०२६ पर्यंत आपल्या प्रभागातील किमान १५ बूथवर ८० टक्क्यांपेक्षा अधिक SIR मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. तसेच, संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा सरचिटणीसांकडून ‘Task Letter Completion’ प्राप्त करून ते विहित मुदतीत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, भोसरीसाठी विकास डोळस आणि पिंपरीसाठी वैशाली खाडये यांच्याकडून जारी केलेले ‘Task Letter Completion’च ग्राह्य धरण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या संघटनात्मक विस्तारासाठी कार्यरत असलेल्या पदाधिकारी, बूथप्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांना आगामी काळात मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने, शहरातील राजकीय वर्तुळात या नियुक्त्यांबाबत उत्सुकता वाढली आहे.

याबाबत शत्रुघ्न काटे म्हणाले की, “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि संघटन मजबूत करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेतली जाते. निर्धारित मुदतीत SIR मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून संबंधित सरचिटणीसांचे ‘ऑफिशियल टास्क कन्फर्मेशन लेटर’ सादर करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांच्याच नावाची शिफारस मी, शहराध्यक्ष या नात्याने, भाजपच्या कोअर कमिटीकडे प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य म्हणून करणार आहे.” निर्धारित निकषांनुसार SIR मोहीम पूर्ण न करणाऱ्या किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारस करण्यात येणार नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथस्तरावरील मजबुतीकरण, मतदार यादी पुनरीक्षण आणि नवमतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या या केवळ राजकीय समतोलासाठी नव्हे, तर आगामी निवडणुकांसाठी सक्षम संघटन उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

अतिवृष्टीमुळे SIR मोहिमेला मुदतवाढ

अतिवृष्टीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, गृहभेटींची प्रक्रिया आता दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. मतदार यादीचे प्रारूप दि. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, दावा-हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा असेल. दावा-हरकतींची छाननी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, अंतिम मतदार यादी दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने बूथस्तरावरील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

“देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मतदारांना SIR प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे कार्यकर्ते बूथस्तरावर सक्रियपणे काम करत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य नियुक्त्यांमध्ये निश्चितच प्राधान्य देण्यात येईल. भाजपामध्ये मेहनत, पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क यांनाच खरे महत्त्व आहे.”

— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकन्व्हेअन्स टाळणाऱ्या बिल्डरला महारेराचा दणका; ३० दिवसांत दस्त नोंदणीचे आदेश
Next Article WhatsAppवर ग्राहक शोधून लॉजमध्ये देहव्यापार; भारती विद्यापीठ पोलिसांनी केला ‘ऑनलाइन’ रॅकेटचा पर्दाफाश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?