Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर डी.वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती कार्यशाळा
पिंपरी चिंचवड

अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर डी.वाय. पाटील महाविद्यालयात जनजागृती कार्यशाळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा पुढाकार; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

पिंपरी, दि.१७ जुलै: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पिंपरी येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांसाठी “अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांसंदर्भात विशेष जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक व कायदेशीर दुष्परिणामांची सविस्तर माहिती देत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालणे आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे अंमली पदार्थ, त्यांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच एनडीपीएस कायद्यातील प्रमुख तरतुदी यांची माहिती दिली.

यावेळी त्यांनी अंमली पदार्थांचे व्यसन केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर त्याचे कुटुंब, शिक्षण, करिअर आणि संपूर्ण समाज उद्ध्वस्त करू शकते, असे सांगून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. तसेच अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२०, मानस हेल्पलाईन १९३३ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष ११२ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट केले.

कार्यक्रमात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, औंध रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ हनुमंत हाडे यांनी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले. तसेच विमल व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक व समुपदेशक विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले. या जनजागृती कार्यशाळेत सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या वतीने राबविण्यात येणारा हा जनजागृती उपक्रम शहरात व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : १६ जुलै २०२६ रोजी दाखल प्रमुख गुन्हे
Next Article मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपी अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?