Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»‘ऑपरेशन म्युल हंट’ : पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सायबर फसवणुकीत वापरली जाणारी पाच म्युल खाती उघड, कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

‘ऑपरेशन म्युल हंट’ : पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सायबर फसवणुकीत वापरली जाणारी पाच म्युल खाती उघड, कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि. १७ जुलै : सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल’ (Mule) बँक खात्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘ऑपरेशन म्युल हंट’ अंतर्गत मोठी कारवाई करत पाच संशयित म्युल खात्यांचा पर्दाफाश केला आहे. या खात्यांमधून अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, संबंधित खातेदारांविरोधात पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर गुन्हेगार स्वतःची बँक खाती न वापरता सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी किंवा आर्थिक गरज असलेल्या व्यक्तींची बँक खाती कमिशन किंवा पैशांचे आमिष दाखवून वापरतात. अशा खात्यांना ‘म्युल खाते’ म्हटले जाते. या खात्यांत सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून ती इतर खात्यांत वळवली जाते किंवा रोख स्वरूपात काढली जाते.

सध्या शेअर मार्केट गुंतवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’, पार्ट-टाईम जॉब अशा विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीत अशा म्युल खात्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तपासादरम्यान गृह मंत्रालयाच्या National Cyber Crime Reporting Portal (NCRP) आणि SAMVAYA Portal वरील माहितीचे विश्लेषण करून पिंपरी-चिंचवड परिसरातील संशयास्पद खात्यांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पाच म्युल खाती उघडकीस आली.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. २३/२०२६ मध्ये GENIUS ENTERPRISES या नावावरील YES बँकेच्या खात्यात अवघ्या ११ दिवसांत ९३.६२ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले असून, त्या खात्याविरोधात देशभरातील १३ सायबर तक्रारी नोंद आहेत.

गुन्हा क्र. २५/२०२६ मध्ये ABHIJIT WEB DEVELOPER या नावावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात ५४.६२ लाख रुपये संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्या खात्यावर दोन तक्रारी आहेत.

गुन्हा क्र. २६/२०२६ मध्ये Salve Developer या खात्यात १६.९७ लाख रुपये, तर गुन्हा क्र. २७/२०२६ मध्ये राहुल राठोड यांच्या खात्यात ३४.३७ लाख रुपये संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले असून, दोन्ही खात्यांवर प्रत्येकी सात सायबर तक्रारी नोंद आहेत.

काळेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. २९९/२०२६ मध्ये थेरगाव येथील एका १९ वर्षीय युवकाच्या खात्यात २३.२३ लाख रुपये संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले असून, त्या खात्यावर गुजरात व दिल्ली येथील दोन तक्रारी नोंद आहेत.

‘ऑपरेशन म्युल हंट’ अंतर्गत म्युल खात्यांची ओळख पटविणे, खातेदार व रॅकेटमधील मुख्य आरोपींना अटक करणे, संशयित खाती गोठविणे (फ्रीझ/लियन), सायबर फसवणुकीतील पैशांचा प्रवाह उघड करणे आणि बँका व राज्य सायबर पोलिसांमधील समन्वय वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (आर्थिक व सायबर) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे व काळेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

सायबर गुन्हेगार कंपनीचे पैसे, गेमिंग फंड, जीएसटी परतावा, कर्जाची रक्कम किंवा सीबील स्कोअर वाढविण्याचे आमिष दाखवून बँक खाते मागतात. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंगची माहिती किंवा खात्याशी जोडलेले सिमकार्ड इतरांना देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Next Article ‘रोड सेफ्टी सारथी मित्र’ उपक्रमांतर्गत पीएमपीएमएल चालक सेवकांना सुरक्षा व सेवा संस्कृतीचे प्रशिक्षण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?