Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनेवर महापालिकेचा मोठा प्रशासकीय बडगा!
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेवर महापालिकेचा मोठा प्रशासकीय बडगा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026Updated:July 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित

९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची कठोर कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…..मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई करत पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने सेवानिलंबित केले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार, मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून आरसीसी इमारतीवर कोसळल्याने नऊ निष्पाप कंत्राटी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमागे कामकाजातील शिथिल पर्यवेक्षण, सुरक्षा उपाययोजनांकडे झालेले दुर्लक्ष आणि कर्तव्यातील गंभीर कसूर कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला आहे.

या प्रकरणी यापूर्वी दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, त्यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक, तथ्यहीन आणि शासन तसेच महापालिकेच्या नियमांशी विसंगत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोघांवरही गंभीर निष्काळजीपणा आणि अक्षम्य हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आली.

आदेशात नमूद केल्यानुसार, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्याकडे कचरा डेपोतील दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची स्थिती तपासणे आणि परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. मात्र, या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक सुरक्षेबाबत आवश्यक दक्षता न घेणे आणि त्यातून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपकाही आदेशात ठेवण्यात आला आहे.

🔴पहिल्या तीन महिन्यांसाठी नियमानुसार उपजीविका भत्ता देण्यात येणार.🔴त्यानंतर नियमांनुसार सुधारित उपजीविका भत्ता लागू राहणार.🔴सेवानिलंबनाच्या काळात कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.🔴दरमहा स्वघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील.मुख्यालय पिंपरी येथेच राहावे लागेल.🔴वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.🔴निलंबन आदेशाची नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकात करण्यात येणार.या सेवा निलंबनाच्या अटी असणार आहेत

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर आणखी काही अधिकारी किंवा संबंधितांवरही कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या बहुचर्चित दुर्घटनेतील पुढील घडामोडींकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“मोशी आता कचऱ्याचा भार सहन करणार नाही!”
Next Article १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरकुलवासीयांचा जनआक्रोश उफाळून आला!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?