Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»“मोशी आता कचऱ्याचा भार सहन करणार नाही!”
पिंपरी चिंचवड

“मोशी आता कचऱ्याचा भार सहन करणार नाही!”

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक निखिल बोऱ्हाडे आक्रमक; “एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही” नगरसेवक निखिल बोऱ्हाडेंचा इशारा

पिंपरी-चिंचवड,  : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर भाजपचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनासह राजकीय नेतृत्वालाच धारेवर धरले. महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत त्यांनी मोशीवरील वाढत्या कचऱ्याच्या भाराचा मुद्दा सभागृहात जोरदारपणे मांडला.

“आमच्या मोशीगावाने संपूर्ण महापालिकेचा ठेका घेतला आहे का? आमच्या गावाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे,” अशा तीव्र शब्दांत बोऱ्हाडे यांनी संताप व्यक्त करत मोशीतील नागरिकांच्या व्यथा मांडल्या. खडकी डेपोतील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत का आणला जात आहे आणि त्यासाठी जबाबदार कोण, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

मोशी परिसरातील नळ आणि बोअरवेलमधून दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेकजण आजारी पडत असल्याचा दावा त्यांनी केला. या गंभीर परिस्थितीसाठी प्रशासनासह सर्वच राजकीय नेतृत्व जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी बोऱ्हाडे यांनी कठोर भूमिका जाहीर करत, “आता मोशीत एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. पुनावळे येथील नियोजित जागेचा तातडीने ताबा घेऊन तेथे नवीन कचरा डेपो सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील किमान दहा प्रभागांमध्ये स्वतंत्र कचरा डेपो उभारण्यात यावेत, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबवून कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करण्यात यावे आणि त्यासाठी विकास आराखड्यात आवश्यक तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

मोशी कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेत ऐरणीवर आल्याने येत्या काळात महापालिका प्रशासन यावर कोणती ठोस भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे-शिरूर मार्गावर देशातील सर्वात लांब डबल डेकर उन्नत महामार्ग; ५३ किमी प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी
Next Article मोशी दुर्घटनेवर महापालिकेचा मोठा प्रशासकीय बडगा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?