Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांचा आकडा ९ वर; ८४ तासांनंतर बचावमोहीम समाप्त
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांचा आकडा ९ वर; ८४ तासांनंतर बचावमोहीम समाप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी एका नागरिकाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री आढळून आल्याने मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. दुर्घटनेतील सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८४ तास सुरू असलेली बचावमोहीम मध्यरात्री २ वाजता अधिकृतपणे थांबविण्यात आली.

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

दुर्घटनेनंतर पाच जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले. उर्वरित १८ जणांपैकी ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र, सलग चार दिवस चाललेल्या शोधमोहीमेत इमारतीत अडकलेल्या सात जणांचे आणि इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका नागरिकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी ९ जुलै रोजी भावेश वाणी यांचा मृत्यू झाला होता.

चौथ्या दिवशी अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड (३४) यांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे (५०, मोशी) यांचा शोध मध्यरात्री १ वाजता लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारत अस्थिर असल्याने आणखी दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरीने काम करण्यात आले. दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटरच्या सहाय्याने वरचा मजला हटवून काँक्रीट फोडत बचाव पथकाने आत प्रवेश केला. एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही शोधकार्यात मदत घेण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण बचावकार्यात प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले. अखेर सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री २ वाजता बचावमोहीम अधिकृतरीत्या संपुष्टात आली.

महापौर रवि लांडगे यांनी या दुर्घटनेला शहरासाठी अत्यंत वेदनादायी घटना संबोधत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “महापौर म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने मन अत्यंत व्यथित झाले आहे. कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी म्हटले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत, “९ नागरिकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. सलग ८४ तास यंत्रणांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशी भावना व्यक्त केली.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटना : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत
Next Article चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?