Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे
पिंपरी चिंचवड

चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 12, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी घेतली भेट 

पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२६) …..पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथे असलेल्या कचरा डेपोमध्ये बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी कचऱ्याचा डोंगर कोसळून येथील अनधिकृत इमारतीखाली चिरडून ९ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लारा या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सक्षम मदत द्यावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

रविवारी (दि. १२ जुलै) चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना शहर प्रमुख चेतन पवार व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी या घटनेत जखमी झालेल्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन सांत्वन केले आणि जखमी कामगारांना भेटून विचारपूस केली.

मोशी येथे झालेली घटना निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. या संपूर्ण प्रकरणात पालिका आयुक्तांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद किंवा एखादे निवेदन सादर करून लोकांना माहिती देणे अपेक्षित होते, की घटनास्थळी एकूण किती लोक होते, त्यातून सुखरूप किती बाहेर काढले, किती जखमी आहेत, किती लोक मृत्युमुखी पडले, या इमारतीचे नेमके स्टेटस काय याची कशाचीही माहिती लोकांना दिली गेली नाही. या सगळ्या प्रकरणातून पालिका आयुक्तांनी पळ काढला आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी यावर बोलणे शिताफीने टाळले.

मोशी येथील या इमारतीचे फक्त तळमजल्याचे कम्प्लीएशन सर्टिफिकेट घेतले असताना दोन मजले विनापरवाना बांधले. त्या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. जे काही महिन्यातच पडले. ५ जून पर्यावरण दिनाच्या दिवशी या कंपनीची चिमणी पडली. बाजूला खदानीचे काम करताना ब्लास्ट मुळे कदाचित कचरा डेपो कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही हे माहीत असूनही येथे संरक्षित भिंत उभारायला हवी होती. तसेच येथे विषारी मिथेन वायू तयार होऊ शकतो तर यावर उपाय केला आहे का. आयुक्त आणि संजय कुलकर्णी यांच्याकडे यावर काही उत्तर नाही.

अगोदरच्या आयुक्तांनी पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत बंगले आणि दुकानांवर कारवाई केली. परंतु पालिकेचे हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही. येथे कामगारांचा जीव वाचवायला केवळ तीन – चार मशीनचा वापर करून महत्वाचा वेळ वाया घालवत अनेकांचा जीव टांगणीला लावला. आर्थिक सुबत्ता त्याच्या मागे यंत्रणा आणि गरिबांच्या मागे कोणीच नाही. पालिका आयुक्तांचे कोणाशी साटेलोटे होते का? या कंपनीत कोणते बायप्रॉडक्ट बनवले जातात, त्यांचा व्यवहार कुणासोबत असतो याबद्दल माहिती दिली नाही.

या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद अजून नाही. मृतांचे नातेवाईक सध्या ट्रॉमामध्ये असल्यामुळे ते पोलीस कम्प्लेंट करणार नाही. यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यायला हवा होता. यात लोक प्रतिनिधी गायब होते. ९ लोकांचा जीव गेला याचे त्यांना काहीही वैशम्य वाटत नाही. हा लोकप्रतिनिधी आणि माणुसकीचा मृत्यू आहे. अधिवेशन चालू असतानाही मुख्यमंत्र्यांनी याचा साधा उल्लेख केला नाही.

अँटनी लारा या कंपनीने मृत कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली परंतु हे यावर उत्तर असू शकत नाही. पालिका आयुक्त आणि प्रकल्पाधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर तत्काळ निलंबन कारवाई का झाली नाही. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासंबंधीत कंपनी, आयुक्त सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी या सगळ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. यासाठी सभागृहात, सभागृहाच्या बाहेर आणि न्यायालयीन लढा आम्ही लढत राहू असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांचा आकडा ९ वर; ८४ तासांनंतर बचावमोहीम समाप्त
Next Article रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?