Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि. १२ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटना ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा गंभीर आरोप करत महापालिका आयुक्त आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. चिंचवड येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवार उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या की, अवघ्या अकरा महिन्यांत इमारत कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांचा ठावठिकाणा काय, प्रकल्पाला नेमका कुणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे आणि संबंधित यंत्रणा एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दुर्घटनेतील सर्व माहिती आणि संबंधितांची अधिकृत यादी प्रशासनाने तातडीने जाहीर करावी, असेही त्या म्हणाल्या.

घनकचरा प्रकल्पातील चिमणी पर्यावरण दिनी कोसळल्यानंतरही महापालिका प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप अंधारे यांनी केला. प्रकल्पालगत असलेल्या खदानीतील ब्लास्टिंग, संरक्षक भिंतीचा अभाव आणि कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेनसारख्या वायूंमुळे नागरिक व कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून वेळेवर आणि अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा संवेदनशील प्रसंगी प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दुर्घटनेनंतर अँटनी लॉरा कंपनीने जाहीर केलेली पाच ते दहा लाख रुपयांची मदत अपुरी असल्याचे सांगत मृत कामगारांना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि इतर कायदेशीर लाभ मिळत होते का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. केवळ आर्थिक मदत जाहीर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, असा इशारा देत दोन दिवसांनंतर पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयीन लढाई लढली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका करत अंधारे म्हणाल्या की, या दुर्घटनेकडे सरकारने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही. पर्यावरण मंत्री, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मंत्री घटनास्थळी न आल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच सफाई कर्मचारी आयोगाने या दुर्घटनेची स्वतःहून दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शांत बसणार नाही. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ संपन्न
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?