Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ संपन्न
पिंपरी चिंचवड

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (दिनांक : १२ जुलै २०२६) …..पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयातील सभागृहात (बार रूम) संपन्न झाला. याप्रसंगी

व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. साधना बोरकर यांचा ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे आणि ॲड. संजय दातीर पाटील यांचे हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी, ‘ॲडव्होकेट साधना बोरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत उल्लेखनीय गुण म्हणजे त्यांचा सेवाभाव असून सरकारी वकील म्हणून त्यांनी केवळ आपल्या पदाची जबाबदारीच पार पाडली नाही; तर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रतही जपले. पक्षकारांना न्याय मिळावा, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कायद्याचे राज्य अधिक सक्षम व्हावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ वृत्तीने कार्य केले!’ असे गौरवोद्गार काढले.

ॲड. सुहास पडवळ यांनी त्यांचे मनोगतात, ‘ॲड. बोरकर यांच्या कामामध्ये कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, अभ्यासूवृत्ती आणि मानवी मूल्यांचा सुंदर संगम दिसून येतो. न्याय हा केवळ कायद्याच्या चौकटीत मर्यादित नसून तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. त्यामुळे त्या केवळ एक सक्षम सरकारी वकील नाहीत, तर समाजाभिमुख, सेवाभावी आणि न्यायनिष्ठ अधिकारी म्हणून सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या आहेत!’ असे विचार व्यक्त केले. महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. रामराजे भोसले, ॲड. सचिन थोपटे, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. किरण पवार, ॲड. विकास पोटघन ॲड. योगेश थांबा, ॲड. प्रतीक जगताप, ॲड. जयश्री कुंटे, ॲड. कांता गोर्डे, ॲड. रूपाली वाघिरे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. सुदाम साने, ॲड. संजना माने यांनीदेखील मनोगते व्यक्त केलीत. सरकारी वकील ॲड. राठोड यांनी, ‘आज आपण एका अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या ज्ञान, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर न्यायव्यवस्थेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी आभार मानले. ॲड. अनिल पवार, ॲड. राकेश जैद, ॲड. शंकर घंघाळे, ॲड. अरविंद नखाते, ॲड. सी एम माने, ॲड. धीरज कुचेरिया, ॲड. आशिष गोरडे, ॲड. शंकर पल्ले, ॲड. प्रसन्न लोखंडे यांनी संयोजनात सहकार्य केले.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; पावसामुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?