Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; पावसामुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; पावसामुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ :– क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् तसेच क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची व झालेल्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान शैक्षणिक इमारतीचा परिसर, पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेली ठिकाणे, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंतीलगतचा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वावराच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित विभागांनी केवळ तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती न करता आवश्यकतेनुसार तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, असे निर्देश महापौर लांडगे यांनी दिले.

परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी ड्रेनेज व स्टॉर्म वॉटर व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, नुकसान झालेल्या बांधकाम व संरचनात्मक भागांची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करावी, धोकादायक अथवा असुरक्षित ठिकाणे तातडीने सुरक्षित करावीत तसेच विद्यार्थ्यांच्या वावराच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संस्थेच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा. आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून तातडीच्या कामांना विलंब न करता सुरुवात करावी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशाही सूचना महापौर लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

“विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अथवा त्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई स्वीकारली जाणार नाही.”

…. रवि लांडगे, महापौर पिंपरी चिंचवड 

यावेळी मा. नगरसदस्य सुरेश भोईर, क्षेत्रीय अधिकारी गोरख लिमन, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, आरोग्य निरीक्षक महेश जगताप तसेच संबंधित अधिकारी व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकडमध्ये चाकूहल्ला; दोघे गंभीर जखमी, एकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
Next Article पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?