Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर

पिंपरी, दि. ११ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये आज चौथ्या दिवशी शोधमोहीमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना त्याच दिवशी सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.

यादरम्यान ९ जुलै रोजी भावेश वाणी या नागरिकास इमारतीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र प्रवेश करण्याचा सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे या इमारतीच्या सभोवतालचा मलबा हटवण्यासाठी १२ पोकलेन, डंपर, जेसीबी मशीनचा वापर करून मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु दुर्घटनाग्रस्त इमारत धोकादायक व अस्थिर असल्याने इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्यास अडचणी आल्या.

काल रात्री दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक काँक्रिट भाग हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशिन घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या मशिनच्या सहाय्याने इमारतीचा अस्थिर भाग नियंत्रित पद्धतीने हटविण्यात आला. त्यानंतर इमारतीत प्रवेश करून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये दिवसभर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३५, मोशी) हे इमारतीमध्ये आढळून आले. त्यानंतर सर्वांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीअखेर मृत असल्याचे सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ८ इतकी झाली आहे.

तथापि, इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली अडकलेल्या एका नागरिकाचा अद्यापही युद्धपातळीवर शोध सुरू आहे. याकरिता एनडीआरएफच्या श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून विविध यंत्रणांचा वापर करून अविरतपणे ही शोधमोहीम सुरू राहणार आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
Next Article वाकडमध्ये चाकूहल्ला; दोघे गंभीर जखमी, एकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?