Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
पिंपरी चिंचवड

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना

पिंपरी, दि. ११ जुलै २०२६: मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, माजी महापौर योगेश बहल, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 “मोशी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि संवेदनशील आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही या दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून मी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमांद्वारे मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते.”

….सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

त्या पुढे म्हणाल्या, “कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येणारे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”

दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.”

नातेवाईकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मी स्वतः बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्या भावना, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. लवकरच राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या संयुक्त बैठकीत त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना न्याय मिळेल, यासाठी आवश्यक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.”

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?