Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी

July 11, 2026

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

July 11, 2026

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ११ जुलै : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी आणि दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत कामगारांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी तसेच कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून सर्व कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केली.

पिंपरी येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोशी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भोसले म्हणाले, महापालिका नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते; मात्र कचरा संकलन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. काही ठेकेदार, दलाल आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ही व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असून ती बेकायदेशीर आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटना ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याचे सांगत, मृत कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य, गणवेश, वैद्यकीय सुविधा किंवा नियमित आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. अनेक वर्षे कचऱ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुर्घटनेनंतर प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात “सेटिंग मॅनेजमेंट” सुरू असल्याची टीका करत त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली इमारत एका मजल्याची परवानगी असताना दोन मजली उभारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे या दुर्घटनेला संबंधित अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेला अत्याधुनिक प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद असून तांत्रिक कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे कचऱ्याचे डोंगर वाढत गेले. त्यामुळे या दुर्घटनेला संबंधित अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे स्वागतार्ह असले तरी प्रत्येक मृत कामगाराच्या वारसाला तातडीने महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून सर्व कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे. त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, ईएसआय, आरोग्य सुविधा आणि वार्षिक वैद्यकीय तपासणी देण्यात यावी. तसेच प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सुमारे साडेतीन हजार सभासद कर्मचाऱ्यांच्या वतीने “समान काम, समान वेतन” आणि सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती देत, पुढील १५ दिवसांत महापालिका आयुक्तांनी संघटनेशी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हजारो कामगारांसह कचरा वाहने घेऊन महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा
Next Article उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी

July 11, 2026

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना पिंपरी, दि. ११ जुलै…

मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा – यशवंतभाऊ भोसले

July 11, 2026

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?